सावरकरांबद्दल काॅंग्रेस नेत्यांचे गाैरवाेद्गारही वाचा, फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 08:49 IST2022-11-19T08:48:43+5:302022-11-19T08:49:26+5:30
Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसच्या नेत्यांनी कोणकोणते गौरवोद्गार काढले होते ते जरूर वाचा, असे आवाहन राहुल गांधी यांना करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एक ट्विट केले.
सावरकरांबद्दल काॅंग्रेस नेत्यांचे गाैरवाेद्गारही वाचा, फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसच्या नेत्यांनी कोणकोणते गौरवोद्गार काढले होते ते जरूर वाचा, असे आवाहन राहुल गांधी यांना करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एक ट्विट केले.
राहुल जी, आपल्या आजी इंदिरा गांधी यांनी सावरकर यांना स्वातंत्र्य आंदोलनाचे आधारस्तंभ आणि भारताचे अजरामर सुपुुत्र म्हटले होते. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी, सावरकर यांना प्रखर राष्ट्रवादी म्हटले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांच्या महान योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी सावरकर यांच्या महान कार्याचा गौरव कोणत्या शब्दांमध्ये केला होता, हेही वाचा असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.