Join us

‘श्रीकांत शिंदे फाउंडेशन’मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप; संजय राऊत यांचे पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:15 IST

उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. या फाउंडेशनमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशा मागणी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

याची धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी, अशी तक्रार वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. परंतु, एक महिना उलटूनही साधी दखल घेतली गेली नाही. आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच माहितीच्या अधिकारात ते याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत, असा राऊत यांचा आरोप आहे.  शिंदे फाउंडेशनकडून कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. त्यांचा स्रोत काय? कोट्यवधी देणारे दानशूर कोण? याची माहिती मिळायला हवी. किमान ५०० कोटी रुपये जमा झाल्याचा राऊत यांचा आरोप आहे.

टॅग्स :संजय राऊतश्रीकांत शिंदे