दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरणातील सर्व आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 10:30 IST2021-07-01T10:30:35+5:302021-07-01T10:30:59+5:30

चोरीची मालमत्ताही हस्तगत

All accused in Dahisar Jewelers murder and robbery case arrested | दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरणातील सर्व आरोपींना अटक

दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरणातील सर्व आरोपींना अटक

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: सोनार शैलेंद्र पांडे (४६) यांच्या दुकानात शिरून त्यांची हत्या करत दरोडा टाकणाऱ्या आरोपींच्या मुसक्या अवघ्या काही तासात दहिसर पोलिसांनी आवळल्या आहेत. यात तीन हुन अधिक आरोपींचा समावेश असुन मुंबईच्या बाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा गाशा गुंडाळण्यात आला. यात पोलिसांनी चोरीला गेलेली १०० टक्के ऐवज हस्तगत केला आहे.

दहिसर पूर्वच्या रावलपाडा परिसरात असलेल्या गावडेनगरमध्ये ओम साई राज ज्वेलर्स नामक दुकान आहे. बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास तीन इसम मास्क घालून पांडे यांच्या दुकानात घुसले. त्यांनी पांडे यांच्या डोक्यातच गोळी झाडली. त्यामुळे पांडे गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळले ज्यात त्यांचा नंतर मृत्यू झाला. त्याचा फायदा घेत त्या मास्क परिधान केलेल्या तिघांनी पांडे यांच्या दुकानातील सोन्याचे दागिने असलेल्या बॅग उचलल्या आणि स्कुटीवरून पसार झाले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी स्कुटीची नंबर प्लेटही वाकडी केली होती मात्र अखेर त्यांना गजाआड करण्यात आले.

Web Title: All accused in Dahisar Jewelers murder and robbery case arrested