Join us  

'संजू' सिनेमाच्या प्रिमियरला ही खास व्यक्ती लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 3:03 PM

संजू या चित्रपटात प्रेक्षकांना संजय दत्तच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळणार आहे. संजय दत्तचे आयष्य हे एखाद्या मसाला चित्रपटाप्रमाणेच आहे.

मुंबई - संजू या चित्रपटात प्रेक्षकांना संजय दत्तच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळणार आहे. संजय दत्तचे आयष्य हे एखाद्या मसाला चित्रपटाप्रमाणेच आहे. संजय चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ड्रग्सच्या पूर्णपणे आहारी गेला होता. तसेच १९९३ ला झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये देखील संजय दत्तचे नाव आले होते. यामुळे संजयने अनेक वर्षं तुरुंगात देखील काढली आहेत. तसेच त्याच्या आयुष्यात आजवर अनेक स्त्रिया आल्या आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात तर तो आपल्याला ३५० तरी गलफ्रेंड होत्या असे सांगताना आपल्याला दिसत आहे. संजूच्या आयुष्याविषयी अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना संजू या चित्रपटातून जाणता येणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर प्रेक्षकांना संजूच्या भूमिकेत दिसणार आहे.

रणबीर कपूरने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत वेक अप सिड, बर्फी, ये जवानी है दिवानी यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याला एकही हिट चित्रपट देता आलेला नाही. त्यामुळे त्याच्या करियरसाठी संजू हा चित्रपट खूपच महत्त्वाचा आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी रणबीर गेल्या कित्येक महिन्यांपासून मेहनत घेत आहे. या चित्रपटातील त्याचा लूक प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटाचा ट्रेलर देखील सोशल मीडियावर हिट झालेला आहे. त्यामुळे रणबीरचा हा चित्रपट हिट होईल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे.

रणबीर कपूर सध्या संजू या चित्रपटासोबतच आणखी एका कारणामुळे चांगलाच चर्चेत आहे. तो ब्रम्हास्त्र या चित्रपटात आलिया भट सोबत झळकणार आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान आलिया आणि रणबीर यांच्यात अफेअर सुरू झाले असून ते दोघे सध्या अनेक ठिकाणी एकत्र दिसत आहेत. रणबीरने देखील आलिया आणि त्याच्या नात्याची मीडियामध्ये कबुली दिली आहे. रणबीरसाठी संजू हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा असल्याने या चित्रपटाच्या प्रिमियरला त्याची प्रेयसी आलिया भट देखील आवर्जून उपस्थित राहाणार असल्याचे म्हटले जात आहे. रणबीरसाठी आलिया प्रिमियरला हजेरी लावते की नाही हे आपल्याला काहीच दिवसांतच कळेल. पण रणबीरच्या चाहत्यांना आलियाची उपस्थिती नक्कीच आवडेल यात काहीच शंका नाही.

टॅग्स :संजू चित्रपट 2018अलिया भटसंजय दत्तरणबीर कपूरकरमणूकबॉलिवूड