Join us  

अजित पवार कोल्हापुरात; स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाची यादी, पण ३ नेत्यांची नाराजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 2:36 PM

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार याची गेल्या महिन्याभरापासून जोरदार चर्चा होती.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झाला नाही, त्यात अजित पवार गटाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे, यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री म्हणून तर, काही ठिकाणी मंत्री म्हणून मंत्र्यांना १५ ऑगस्ट दिनी ध्वजारोहनासाठी उपस्थित राहवे लागणार आहे. त्यासाठी, राज्य सरकारच्यावतीने मंत्र्यांच्या नावासह स्वातंत्र्य दिनी ध्वजवंदनासाठी त्यांच्या जिल्ह्याचं ठिकाण निश्चित करण्यात आलं आहे. याची यादीही समोर आली असून काही नेते नाराज असल्याचं समजतंय. त्यामुळे, या यादीत बदल होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार याची गेल्या महिन्याभरापासून जोरदार चर्चा होती. परंतु, सध्या तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार असल्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ध्वजवदंन करण्यात येते. स्वातंत्र्यदिनाचा ध्वजवंदन जिल्हा मुख्यालयात कोण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे, अजित पवार नाराज असल्याचे समजते. तसेच, मंत्री छगन भुजबळ हेही नाराज असून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसेही देण्यात आलेल्या जिल्ह्यामुळे नाराज असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे, या यादीत बदल होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

छगन भुजबळ यांना अमरावीत जिल्ह्यात ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आलीय. तर, दादा भुसे यांना धुळे जिल्ह्याची जबाबदारी आहे. मात्र, हे दोन्ही नेते दुसऱ्या जिल्ह्यांसाठी आग्रही असल्याचे समजते. तर, अजित पवार हेही पुणे जिल्ह्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. त्यामुळे, झेंडावंदनाच्या मान-सन्मानाच्या नाट्यावर कसा पडदा पडतो, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, शिवसेना व भाजपच्या मंत्र्यांकडे एका पेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी होती. ती आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याकडे पालकमंत्री म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी ध्वजवंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस – नागपूरअजित पवार – कोल्हापूरछगन भुजबळ – अमरावतीसुधीर मुनगंटीवार – चंद्रपूरचंद्रकांत पाटील – पुणेदिलीप वळसे पाटील – वाशिमराधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगरगिरीश महाजन – नाशिकदादा भुसे – धुळेगुलाबराव पाटील – जळगावरविंद्र चव्हाण – ठाणेहसन मुश्रीफ – सोलापूरदीपक केसरकर – सिंधुदुर्गउदय सामंत – रत्नागिरीअतुल सावे – परभणीसंदीपान भुमरे – औरंगाबादसुरेश खाडे – सांगलीविजयकुमार गावित – नंदुरबारतानाजी सावंत – उस्मानाबादशंभूराज देसाई – साताराअब्दुल सत्तार – जालनासंजय राठोड – यवतमाळधनंजय मुंडे – बीडधर्मराव आत्राम – गडचिरोलीमंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगरसंजय बनसोडे – लातूरअनिल पाटील – बुलढाणाआदिती तटकरे - पालघर

या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार

जिल्हाधिकारी रायगड -  रायगडजिल्हाधिकारी हिंगोली -  हिंगोली जिल्हाधिकारी वर्धा -        वर्धाजिल्हाधिकारी गोंदिया -   गोंदिया जिल्हाधिकारी भंडारा -    भंडारा   जिल्हाधिकारी अकोला -  अकोला जिल्हाधिकारी नांदेड -     नांदेड  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसस्वातंत्र्य दिनछगन भुजबळ