Aishwarya Sharon's 16 fake Instagram accounts | ऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट

ऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट

मनीषा म्हात्रे

मुंबई : माजी मिस इंडिया फायनलीस्ट आणि यूपीएससीच्या परीक्षेत ९३ वा क्रमांक मिळविणाऱ्या मॉडेल ऐश्वर्या शेरॉनच्या (२३) नावाचा वापर करीत १६ बनाबट इन्स्टाग्राम अकाउंट सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत समजताच ऐश्वर्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार कुलाबा पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद करीत अधिक तपास सुरू केला आहे.

कुलाबा येथील आर्मी अधिकारी वसाहतीत ऐश्वर्या कुटुंबीयांसोबत राहते. तिचे वडील अजय कुमार हे तेलंगना येथील करीम नगर येथे कर्नल या पदावर कार्यरत आहेत. ऐश्वर्या प्रसिद्ध मॉडेल असून २0१६ मध्ये मिस इंडियाची फायनलीस्ट होती. ऐश्वर्याने नुकतीच २0१९ ची यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यात तिचा ९३ वा क्रमांक आहे. पहिल्या प्रयत्नातच यूपीएससीची परीक्षा पास करणाºया ऐश्वर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना, ५ आॅगस्ट रोजी एका मुलाखतीदरम्यान तिच्या नावाने खूप सारे इन्स्टाग्राम अकाउंट असल्याची माहिती मिळाली. कोणीतरी आपल्या माहितीचा गैरवापर करीत असल्याने ऐश्वर्याने कुलाबा पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा नोंद केल्याच्या वृत्ताला दुजोरा देत, अधिक तपास सुरू असल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी फडतरे यांनी दिली आहे.

फेक फॉलोअर्स रॅकेट कनेक्शन...
सेलिब्रिटींचे बनावट अकाउंट तयार करून, त्याद्वारे मार्केटिंगचा घाट घालणाºया तसेच बनावट फॉलोअर्सची विक्र ी करणाºया रॅकेटचा गुन्हे गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. यापूर्वी बॉलीवूड पार्श्वगायिका आणि अभिनेत्री कोयना मित्राचे बनावट खाते तयार करण्यात आले होते. या प्रकरणातही या रॅकेटचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aishwarya Sharon's 16 fake Instagram accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.