एअरटेल, जिओचे नेटवर्क मेट्रो ३ मार्गिकेवर गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:13 IST2025-05-21T16:13:39+5:302025-05-21T16:13:51+5:30

मेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर सेवा सुरू होऊन आठवडा उलटला आहे.

Airtel, Jio's network disappears on Metro 3 route | एअरटेल, जिओचे नेटवर्क मेट्रो ३ मार्गिकेवर गायब

एअरटेल, जिओचे नेटवर्क मेट्रो ३ मार्गिकेवर गायब

मुंबई : आरे ते कफ परेड मेट्रो ३ मार्गिकेवर अनेक कंपन्यांचे मोबाइल नेटवर्क नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली. मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आणि टेलिकॉम सेवा पुरवठादार यांच्यातील तिढा कायम असल्याने या मार्गिकेवर केवळ वीआय कंपनीचे नेटवर्क सुरू आहे. त्यातून एअरटेल व जिओ या कंपन्यांनी त्यांची सेवा सुरू केली नसल्याची स्थिती आहे. 

मेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर सेवा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, तरीही या मेट्रो मार्गिकेवर अद्याप दोन प्रमुख सेवा पुरवठादारांनी नेटवर्क सुविधा पुरविलेली नाही. त्यामुळे डिजिटल तिकीट खरेदी करण्यासह अन्य सुविधांचा वापर करताना प्रवाशांना अडचणी येत आहेत. एमएमआरसीने या मेट्रो मार्गिकेवर नेटवर्क सुविधा पुरविण्यासाठी एका थर्ड पार्टी वेन्डरची नियुक्ती केली आहे. मात्र, टेलिकॉम सेवा पुरवठादारांनी त्याला विरोध दर्शविला.

टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून एकत्रित नेटवर्कचा प्रस्ताव दिला होता. मात्र, एमएमआरसीने त्याकडे दुर्लक्ष केले, तसेच थर्ड पार्टी वेन्डरची नियुक्ती केली. टेलिकॉम कंपन्या नेटवर्क उभारण्यास अतिरिक्त महसूल न मिळताही गुंतवणूक करायला तयार आहे. मात्र, एमएमआरसीचे अवाजवी दर देणे त्यांना शक्य नाही. त्यातच अंतिम तोडगा निघेपर्यंत रक्कम थर्ड पार्टी वेन्डरला न देता किंवा टेलिकॉम कंपन्यांकडून न घेता प्रवाशांना अखंड मोबाइल कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रस्ताव ७ एप्रिलला दिला होता. मात्र, एमएमआरसीने तो दुर्लक्षित केला, असा आरोप सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डॉ. एस.पी. कोचर यांनी केला आहे.

Web Title: Airtel, Jio's network disappears on Metro 3 route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.