अवकाळीच्या सरी पडल्या पथ्यावर, दीपावलीतील हवा प्रदूषण गेले वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 08:12 IST2025-10-26T08:11:10+5:302025-10-26T08:12:07+5:30
छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, जळगाव, भिवंडी, मिरा भाईंदर शहरातील हवा आणखी खराबच

अवकाळीच्या सरी पडल्या पथ्यावर, दीपावलीतील हवा प्रदूषण गेले वाहून
बाळासाहेब बोचरे
मुंबई : हवा प्रदूषणाबाबत सतत चिंतेत असतानाही आपण दिवाळीच्या जल्लोषात फटाके फोडतो आणि हवा आणखी बिघडवतो. आणि दिवाळीनंतर सर्दी-खोकला यासारख्या आजाराला आमंत्रण देतो. यंदा मात्र ऐन दिवाळीतच पाऊस आल्याने वाढलेले हवा प्रदूषण लगेचच पूर्णतः विरून गेले सर्वत्र स्वच्छ हवा अनुभवास येत आहे. छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, जळगाव, भिवंडी, मीरा भाईंदर शहरातील हवेची गुणवत्ता मात्र खालावल्याचे आढळून आले.
निर्देशांक किती ?
पावसाळा थांबल्यानंतर ११ ते २० ऑक्टोबरपर्यंत राज्यातील हवा प्रचंड प्रदूषित झाल्याचे पाहायला मिळाले. अगदी निर्देशांक १८०पर्यंत गेला होता. परंतु ऐन दिवाळीत पाऊस झाल्याने घडीला महाराष्ट्राचा हवा स्वच्छ झाली आणि आजच्या हवेचा सरासरी निर्देशांक ५७ ते ९९ असा आहे.
२४तास मोजमाप
देशातील विविध शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविणारा निर्देशांक असतो. त्यामध्ये शून्य ते ५० पर्यंत निर्देशांक असलेली शहरे पूर्ण स्वच्छ मानली जातात.
५० ते १०० या दरम्यान निर्देशांक असलेली शहरे प्रदूषणाकडे वाटचाल करणारी मानली जातात. १०० ते १५० पर्यंत निर्देशांक असेल तर हवा बिघडली असे मानले जाते. २०० पर्यंत निर्देशांक गेल्यास हवा अपायकारक मानली जाते. २००च्या वर आणि ३०० पर्यंत निर्देशांक असेल तर गंभीर बाब मानली जाते. ३००च्या वर निर्देशांक गेल्यास अशा शहरातील हवा ही शरीरास धोकादायक मानली जाते.
राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरे
१३८ मीरा भाईंदर
१३४ भिवंडी
१२४ भुसावळ
११९ छत्रपती संभाजीनगर
१०७ जळगाव
विविध शहरे आणि हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक
१ धुळे ९०
२ अकोला ९०
३ परभणी ८९
४ नागपूर ८७
५ अहमदनगर ८४
६ नांदेड ८२
७ अमरावती ७९
८ मालेगाव ७७
९ कुपटी ७६
१० यवतमाळ ७५
११ जुन्नर ७४
१२ चिंचवड ७३
१३ लातूर ७२
१४ सांगली ७०
१५ धाराशिव ६८
१६ पुणे ६७
१७ नवी मुंबई ६६
१८ पाचगणी ६५
१९ कोल्हापूर ६४
२० खेड ६३
२१ इचलकरंजी ६२
२२ उल्हासनगर ६१
२३ चंद्रपूर ६०
२४ कल्याण ५९
२५ मुंबई ५७
२६ ठाणे ५६
२७ धामणगाव ५५
२८ नाशिक ५४
२९ सोलापूर ५२
३० तारापूर ४९