Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

By मनोज गडनीस | Updated: May 9, 2024 21:00 IST

मंगळवारी एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० पेक्षा जास्त वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी पडल्याचे कारण देत सामुहिक रजा घेतली होती.

मुंबई - अचानक आजारपणाचे कारण पुढे करत सामुहिक रजा घेत आंदोलन करणाऱ्या एअर इंडिया कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सायंकाळी अखेर मिटला. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्यानंतर कंपनीने २५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांची गुरुवारी हकालपट्टी केली होती. मात्र, कंपनीचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेत झालेल्या चर्चेदरम्यान या वादांवर तोडगा निघाला असून हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांना देखील नोकरीवर परत घेण्यात आले आहे.

मंगळवारी एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० पेक्षा जास्त वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी पडल्याचे कारण देत सामुहिक रजा घेतली होती. त्यामुळे कंपनीच्या विमान सेवेला मोठा फटका बसला. त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि मुख्य कामगार आयुक्तांनी याची दखल घेत कंपनीला नोटिस जारी केली होती. मात्र दिल्लीत मुख्य कामगार आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर गुरुवारी संध्याकाळी हा संप कर्मचाऱ्यांनी मागे घेत ते तातडीने कामावर रुजू झाले.

टॅग्स :एअर इंडियाआंदोलनसंपकर्मचारी