Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:40 IST2025-06-13T10:40:08+5:302025-06-13T10:40:50+5:30
Air India Flight AIC129: मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान काही तासाने मुंबईत परतले.

Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान काल अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेला काही तास उलटले तोच, एअर इंडियाने आज सकाळी मुंबईहू लंडनला जाणाऱ्या विमानाला अर्ध्यातूनच माघारी बोलावून घेतले. त्यानतंर उलटसुलट चर्चांना उधाण आले. याबाबत एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
एअर इंडियाने एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, "इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही विमाने वळवण्यात आली. तर, काही विमानांना पुन्हा परतण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत एअर इंडियाने यादी जाहीर केली. या यादीत मुंबई लंडन फ्लाइट एआय १२९ विमानाचाही समावेश आहे. हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे."
#TravelAdvisory
— Air India (@airindia) June 13, 2025
Due to the emerging situation in Iran, the subsequent closure of its airspace and in view of the safety of our passengers, the following Air India flights are either being diverted or returning to their origin:
AI130 – London Heathrow-Mumbai – Diverted to Vienna…
एअर इंडियाने जाहीर केलेली विमानाची यादी
एआय १३० - लंडन हीथ्रो-मुंबई – व्हिएन्नाकडे वळवले
एआय ०२- न्यू यॉर्क-दिल्ली – शारजाहकडे वळवले
एआय ११६- न्यू यॉर्क-मुंबई – जेद्दाहकडे वळवले
एआय २०१८- लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबईकडे वळवले
एआय १२९- मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईकडे परतली
एआय ११९- मुंबई-न्यू यॉर्क – मुंबईकडे परतली
एआय १०३- दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीकडे परतली
एआय १०६- नेवार्क-दिल्ली – दिल्लीकडे परतली
एआय १८८- व्हँकूवर-दिल्ली – जेद्दाहकडे वळवले
एआय १०१- दिल्ली-न्यू यॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे परतली
एआय १२६- शिकागो-दिल्ली – जेद्दाहकडे परतली
एआय १३२- लंडन हीथ्रो-बेंगळुरू - शारजाहला वळवले
एआय २०१६- लंडन हीथ्रो-दिल्ली - व्हिएन्नाकडे वळवले
एआय १०४- वॉशिंग्टन-दिल्ली - व्हिएन्नाकडे वळवले
एआय १९०- टोरंटो-दिल्ली - फ्रँकफर्टला वळवले
एआय १८९- दिल्ली-टोरंटो - दिल्लीकडे परतली