‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:07 IST2025-10-06T06:07:28+5:302025-10-06T06:07:40+5:30
शनिवारी अमृतसरहून बर्मिंगहॅमला निघालेल्या एअर इंडियाचे फ्लाइट एआय-११७ मध्ये अचानक आरएटी सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले.

‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एअर इंडियाच्या अमृतसर-बर्मिंगहॅमच्या विमानातील रॅम एअर टर्बाईन(आरएटी) ही आपत्कालीन यंत्रणा अचानक सक्रिय झाल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या बिघाडानंतरही विमान व्यवस्थित लँड झाल्याने जीवितहानी टळली.
शनिवारी अमृतसरहून बर्मिंगहॅमला निघालेल्या एअर इंडियाचे फ्लाइट एआय-११७ मध्ये अचानक आरएटी सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विमानाचे बर्मिंगहॅम येथे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
काय आहे आरएटी? : आरएटी ही छोटी पंख्यासारखी यंत्रणा असून, ती वाऱ्याच्या वेगावर चालते. आपत्कालीन परिस्थितीत विमानास वीज व हायड्रॉलिक शक्ती, पुरवण्यास मदत होते. विमानाचे दोन्ही इंजिन किंवा संपूर्ण इलेक्ट्रिकल व हायड्रॉलिक प्रणाली बंद पडल्यास आरएटी यंत्रणा आपोआप सक्रिय होते.