एअर इंडियाची एअर हॉस्टेस विमानातून पडली; प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 10:14 IST2018-10-15T10:11:09+5:302018-10-15T10:14:25+5:30

विमानाचा दरवाजा उघडताना 30 फुटांवरुन पडल्यानं गंभीर जखमी

Air India cabin crew member falls from aircraft critical | एअर इंडियाची एअर हॉस्टेस विमानातून पडली; प्रकृती गंभीर

एअर इंडियाची एअर हॉस्टेस विमानातून पडली; प्रकृती गंभीर

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाची कर्मचारी विमानातून खाली पडल्याची घटना घडली आहे. एअर इंडियाचं विमान छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उभं असताना हा प्रकार घडला. हर्षा लोबो असं या कर्मचाऱ्याचं नाव असून बोईंग 377 विमानाचा दरवाजा उघडताना त्या खाली पडल्या. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हर्षा लोबो सध्या शुद्धीवर आहेत. मात्र 30 फूटांवरुन पडल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. एअर इंडियाचं एआय 864 हे विमान सकाळी 7 वाजता दिल्लीसाठी उड्डाण करणार होतं. 'विमानाच्या उड्डाणाआधी त्यांनी एल5 दरवाजा उघडला. त्यावेळी त्या खाली पडल्या,' अशी माहिती सूत्रांनी दिली. यानंतर त्यांना रुग्णावाहिकेतून तातडीनं नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अद्याप याबद्दल एअर इंडियाच्या प्रशासनानं कोणतीही माहिती दिलेली नाही. 

Web Title: Air India cabin crew member falls from aircraft critical