ऐन दिवाळीत थंडी गायब; पारा ३६ अंशावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 02:53 PM2020-11-15T14:53:08+5:302020-11-15T14:53:30+5:30

cold disappears : मुंबईच्या तापमानात वाढ

Ain Diwali cold disappears; Mercury at 36 degrees | ऐन दिवाळीत थंडी गायब; पारा ३६ अंशावर

ऐन दिवाळीत थंडी गायब; पारा ३६ अंशावर

Next

मुंबई : नोव्हेंबर महिन्याची पहाट गुलाबी थंडीने उजाडली खरी; मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्यातापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान २५ अंशावर दाखल झाले आहे. तापमानातील वाढीमुळे ऐन दिवाळीत थंडी गायब झाल्याचे चित्र आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, मुंबईचे कमाल तापमान ३६ अंशावर दाखल झाले आहे. गेल्या ४८ तासांपासून हवामानात हे बदल नोंदविण्यात आले आहेत. शिवाय पुढील ४८ तासांत तापमान ३६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. कोकण विभागातही तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. हे तापमान ३२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

मुंबईच्या किमान तापमानात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगली घसरण झाली होती. हे किमान तापमान १९ अंशाच्या आसपास दाखल झाले होते. किमान तापमानात घसरण झाल्याने मुंबईकरांना पहाटे गुलाबी थंडी जाणवत होती. गेल्या आठवड्याभर मुंबईत आल्हादायक थंडी होती. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईतली थंडी गायब झाली आहे. दिवाळीदरम्यान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे.

मुंबईचे किमान तापमान
१३ नोव्हेंबर : २३ अंश
१४ नोव्हेंबर : २४ अंश
१५ नोव्हेंबर : २५ अंश


 

Web Title: Ain Diwali cold disappears; Mercury at 36 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.