शाहरुखपाठोपाठ गौरी खान लेकाला भेटायला आली आर्थर रोड कारागृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 02:49 PM2021-10-25T14:49:47+5:302021-10-25T15:28:15+5:30

Gauri Khan Reaches to Arthur Road jail : ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यनला वडील शाहरुख पहिल्यांदा भेटला.

After Shah Rukh, Gauri Khan came to meet Leka at Arthur Road Jail | शाहरुखपाठोपाठ गौरी खान लेकाला भेटायला आली आर्थर रोड कारागृहात

शाहरुखपाठोपाठ गौरी खान लेकाला भेटायला आली आर्थर रोड कारागृहात

Next
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी शाहरुखने आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली होती. आता गौरी खान आर्यनची भेट घेण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात पोहोचली आहे.

क्रुझवरील अमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टाचे न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली होती. आता गौरी खान आर्यनची भेट घेण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात पोहोचली आहे.

ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यनला वडील शाहरुख पहिल्यांदा भेटला. शाहरुखने गुरुवारी आर्थर रोड या तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली होती. २५ ऑक्टोबर म्हणजेच आज शाहरुख आणि गौरी यांच्या लग्नाचा ३०वा वाढदिवस आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करत नाही आहे. दिग्गज वकिलांची फौज उभी करून देखील आर्यनची जेलमधून सुटका झाली नाही. त्यामुळे आता गौरी आर्यनला भेटायला आर्थर रोड तुरुंगात त्याची भेट घेणार आहे.

आर्यन तुरुंगात त्रस्त आहे

हिंदुस्थान टाइम्सच्या अहवालांनुसार, आर्यन दररोज तुरुंगात संध्याकाळी आरतीला उपस्थित राहतो. त्याचा त्रास पाहून तुरुंगातील कर्मचारी आर्यनला लायब्ररीतून त्याच्या आवडीची पुस्तके वाचून वेळ घालवण्याचा सल्ला देतात. जेल लायब्ररीत अनेक धार्मिक आणि प्रेरक पुस्तके आहेत.

धार्मिक पुस्तके वाचण्यात वेळ घालवणे
आर्यनने जेलच्या लायब्ररीतून दोन पुस्तके घेतली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रभू राम आणि माता सीता यांच्यावर लिहिलेले पुस्तक वाचत आहेत. यापूर्वी खान यांनी 'द लायन्स गेट' नावाचे पुस्तक वाचले होते. कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कैद्याला हवे असल्यास तो त्याच्या नातेवाईकांकडून त्याच्या आवडीचे पुस्तक घेऊ शकतो, मात्र केवळ धार्मिक पुस्तकांनाच परवानगी आहे. या व्यतिरिक्त, जर कैदी तुरुंगातून बाहेर पडताना एखादे पुस्तक जेलमध्ये सोडून जातो, तर त्या पुस्तकास जेल लायब्ररीतही समाविष्ट केले जाते.

 

 

Web Title: After Shah Rukh, Gauri Khan came to meet Leka at Arthur Road Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.