Join us

'मोदी सरकार आल्यावर महात्मा गांधींना शिवीगाळ करण्याचा कार्यक्रम सुरू झालाय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 17:43 IST

कालिचरण महाराज अकोल्याचे असल्याची प्राथमिक माहिती असल्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे या महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करणार असल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली

ठळक मुद्देहा मुद्दा नवाब मलिक यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर सक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

मुंबई - छत्तीसगड येथे फर्जीबाबा कालिचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना शिवागाळ केली असून हे देशातील जनता सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. अशा वक्तव्यांना देश कधीही सहन करणार नाही. तसेच गोडसेचा महिमामंडळ होत असताना आता मोदी सरकार आल्यावर देशात महात्मा गांधीजींना शिवागाळ करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. 

कालिचरण महाराज अकोल्याचे असल्याची प्राथमिक माहिती असल्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे या महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करणार असल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या कालीचरण महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असेही मलिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हा मुद्दा नवाब मलिक यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर सक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :नवाब मलिकमहात्मा गांधीनरेंद्र मोदीभाजपा