तब्बल आठ वर्षांनंतर दोन आरोपींवर आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:21 AM2019-09-15T06:21:43+5:302019-09-15T06:21:49+5:30

शहरात १३ जून २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटातील दोन आरोपींवर विशेष न्यायालयाने शुक्रवारी आरोप निश्चित केले

After eight years, two accused were convicted | तब्बल आठ वर्षांनंतर दोन आरोपींवर आरोप निश्चित

तब्बल आठ वर्षांनंतर दोन आरोपींवर आरोप निश्चित

Next

मुंबई : शहरात १३ जून २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटातील दोन आरोपींवर विशेष न्यायालयाने शुक्रवारी आरोप निश्चित केले. या बॉम्बस्फोटांत २७ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले होते. या प्रकरणी एटीएसने ११ जणांना अटक केली होती.
१३ जून २०११ रोजी संध्याकाळी सात वाजता मुंबईतील तीन वेगवगेळ्या ठिकाणी काही मिनिटांत बॉम्बस्फोट झाले. पहिला बॉम्बस्फोट आॅपेरा हाउस, दुसरा बॉम्बस्फोट झवेरी बाजाराजवळ तर तिसरा बॉम्बस्फोट दादर कबुतरखान्याजवळ झाला.
शुक्रवारी विशेष न्यायालयाने सय्यद इस्माईल अफाक अलीम लंका, सद्दाम हुस्सेन फिरोज खान या दोघांवर आरोप निश्चित केले. भारतीय दंडसंहितेअंतर्गत कट रचणे आणि हत्या तर स्फोटके कायदा, यूएपीएच्या काही कलमांअंतर्गत आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत.
एटीएसच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकमध्ये भटकळकडे राहणाऱ्या दोघांनी अन्य आरोपींना स्फोटासाठी स्फोटके पुरविली. यासिन भटकळला ती पुरविल्याचा संशय आहे. भटकळ हा बंदी घातलेल्या इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. त्याने अन्य सहकाऱ्यांसह तिहेरी बॉम्बस्फोटाचा कट रचला.
लंका, होमियोपॅथी डॉक्टर, हा आयएमचा संस्थापक रियाझ भटकळच्या सतत संपर्कात होता. त्याने जिलेटीनच्या कांड्या, डिटोनेटर आणि अन्य स्फोट घडविणाºया वस्तू मंगळुरूवरून खरेदी केल्या व अन्य आरोपींना दिल्या. एप्रिल २०१६ मध्ये अटक केलेल्या खानने हवालाद्वारे आलेले पैसे अन्य आरोपींपर्यंत पोहोचविले. आरोपींनी स्फोटकके भरलेल्या स्कूटर लक्ष्य असलेल्या ठिकाणी पोहोचविल्या, असे तपासयंत्रणेचे म्हणणे आहे.
बॉम्बस्फोट करण्यापूर्वी भटकळ भायखळ्यात भाड्याने रूम घेऊन राहिला. तेथेच त्याने स्फोटकांची जमवाजमव केली.
>अन्य आरोपींवर पुढील आठवड्यात
होणार आरोप निश्चित
अटक केलेल्या ११ आरोपींपैकी ज्यांना मुंबईच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे, त्यांनी मुंबईबाहेरच्या आरोपींचा आणि आपल्यावरील खटला स्वतंत्र चालविण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा दिल्ली आणि बंगळुरूच्या पोलिसांनी त्या आरोपींना मुंबई न्यायालयात हजर केले नाही. त्यामुळे खटल्याला विलंब होत आहे, असे मुंबईतील आरोपींचे म्हणणे आहे. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला. शुक्रवारी बंगळुरूच्या दोन आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आणि पुढील आठवड्यात अन्य आरोपींवर आरोप निश्चित करण्यात येणार आहेत.

Web Title: After eight years, two accused were convicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.