After the BJP leader's suggestion, anger among the netizens, the protesters compared to Dawood | भाजप नेत्याच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांमध्ये संताप, आंदोलकांची तुलना दाऊदशी

भाजप नेत्याच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांमध्ये संताप, आंदोलकांची तुलना दाऊदशी

मुंबई : आता लवकरच महाराष्ट्र सरकारकडून दाऊदलाही क्लीन चीट दिली जाईल. त्याच्यावरील सर्व गुन्हे काढून टाकले जातील. सध्या राज्यात गुन्हे माफ करण्याचा मोसम सुरू आहे. त्यामुळे त्वरा करा, असे उपरोधिक टिष्ट्वट भाजयुमो मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय यांनी केले आहे. भाजप नेत्याने सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास टिष्ट्वट केले असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मोहित भारतीय यांनी आरे मधील आंदोलकांची तुलना दाऊदशी कशी काय केली, असा सवाल नेटकरी करत आहेत.
देशद्रोही दाऊदची बरोबरी ‘आरे’ व ‘नाणार’ रिफायनरी आंदोलकांसोबत करत आहात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह आणि जेपी नड्डा बघा कसे बरळत आहेत. ‘भारतीय’ म्हणवून घेणाºया व्यक्तीकडून अशा प्रकारचा विचार व्हावा, हे खूप विदारक आहे. तुमचे हे म्हणणे भाजपला मान्य आहे का? स्वत:ला सुधारा, असा सवाल नेटकºयांनी केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After the BJP leader's suggestion, anger among the netizens, the protesters compared to Dawood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.