Join us  

चार ठिकाणी लवकरच वैमानिक प्रशिक्षण संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:34 PM

अमरावती, धुळे, कराड आणि शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे

- यदू जोशी मुंबई : अमरावती, धुळे, कराड आणि शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रविमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे.वैमानिक तसेच विमानतळावर आवश्यक अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्रातच देण्याबाबतचे धोरण एमएडीसीने तयार केले, त्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत पहिली प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येईल, असे एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी लोकमतला सांगितले. वैमानिक, क्रू मेंबर आदींचे प्रशिक्षण देणाºया कंपन्या/संस्थामार्फत हे प्रशिक्षण दिले जाईल. कंपन्या राज्य सरकारला विशिष्ट मोबदला देतील, प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा स्वत:च निर्माण करतील. स्थानिकांना रोजगार मिळेल आणि प्रशिक्षित हवाई वाहतूक कर्मचारीही उपलब्ध होतील. चारपैकी फक्त शिर्डीतून सध्या प्रवासी वाहतूक चालते. प्रशिक्षणाचे काम निविदा काढून दिले जाणार आहे.शिर्डी विमानतळाची सध्याची धावपट्टी २५०० मीटर इतकी आहे. ती आता ३२०० मीटर लांब बनविण्याचे काम सुरू आहे. तसेच नाईट लँडिंग सुविधाही तेथे लवकरच सुरू होणार आहे. दोन्ही कामे तातडीने पूर्ण झाली नाहीत तरी आॅक्टोबरपासून शिर्डी विमानतळावरून दिल्ली, इंदूर, बंगळुरू, भोपाळ, नागपूर, चेन्नई या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या शिर्डीतूनमुंबई व हैदराबादसाठी विमानसेवासुरू आहे.उडाण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच लहान शहरांमधून विमान वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील सोलापूर वगळताकोल्हापूर, नांदेड, नाशिक व जळगावमधून विमान वाहतूक सुरू करण्यात आली आहे.अकोला, चंद्रपूरलाही संधीअकोला विमानतळ बंद असून त्याचा ताबा देण्याची मागणी एमएडीसीने प्राधिकरणाकडे केली आहे. तसे झाल्यास अकोला विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल.चंद्रपूर जिल्ह्यात राजुरानजीक नवे विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूसंपादन प्रक्रियेस एक महिन्यात सुरूवात होईल. विमानतळ उभारणीसाठी सल्लागाराची नियुक्ती १५ दिवसांत होईल.

टॅग्स :विमानमहाराष्ट्रअमरावतीधुळेशिर्डी