Maratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 14:53 IST2018-12-10T13:52:38+5:302018-12-10T14:53:58+5:30

उच्च न्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे.

Advocate petition against Maratha reservation gunratne sadavarte has been beaten up | Maratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला

Maratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला

मुंबई: उच्च न्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. हल्ला करणाऱ्या वैजनाथ पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वैजनाथ पाटील हा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

सरकारने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार का, या प्रश्नावर मंथन सुरू असतानाच याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता न्यायालय काय निकाल देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आजच राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला संरक्षण मिळाले असून राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाकडून या आरक्षणाला स्थगिती देता येणार नाही.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे. विधिमंडळात मराठा समाज आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर, राज्यपालांनी सही केल्यानंतर 1 डिसेंबरपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा लागू झाला आहे. मात्र, मराठा समजाला मिळाले आरक्षण न्यायालयात टिकणार का? असा प्रश्न सर्रास विचारला जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण कोर्टात टिकेल, असा दावा केला आहे. तरीही मराठा आरक्षणाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

सदावर्तेंवर हल्ला करणारा नक्की आहे तरी कोण?
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज वैजनाथ नावाच्या व्यक्तीनं हल्ला केला आहे. वैजनाथ पाटील ही व्यक्ती जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा गावात वास्तव्याला आहे. मागील चार महिन्यांपासून तो पुण्यात नोकरी शोधत होता. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून, आई-वडील शेतकरी आहेत. 

Web Title: Advocate petition against Maratha reservation gunratne sadavarte has been beaten up