पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून; मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 04:06 IST2025-05-13T04:06:36+5:302025-05-13T04:06:36+5:30

१७ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

admission process for postgraduate courses start today mumbai university announces schedule | पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून; मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून; मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आज, १३ मेपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येतील. त्यानंतर १७ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्याचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.

विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडिओ लिंकही देण्यात आली आहे. दरम्यान, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग १ जुलैपासून सुरू केले जाणार आहेत. 

सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन नावनोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर करणे - १३ मे ते ०३ जून 
विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी – ०९ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी- १० जून
तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर विद्यार्थी तक्रार – १२ जून (दुपारी १ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी – १७ जून
ऑनलाईन शुल्क भरणे – १८ जून ते २१ जून
द्वितीय गुणवत्ता यादी- २४ जून
ऑनलाईन शुल्क भरणे – २५ जून ते २७ जून
कमेंसमेंट ऑफ लेक्चर्स – ०१ जुलै

 

Web Title: admission process for postgraduate courses start today mumbai university announces schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.