Join us

Aditya Thackeray: दरवर्षी मिळणाऱ्या २५ ते ३० हजार कोटींचं केलं काय? मनसेचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 15:25 IST

मुंबईचा विकास, समस्या आणि खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शिवसेनाल लक्ष्य केले

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेस पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी पुण्यातून सुरूवात करण्यात आली. क्यू. आर कोडचा वापर करून होत असलेल्या या सदस्य नोंदणीत पक्षाचे पहिले प्राथमिक सदस्य करून घेतल्याबद्दल राज यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. मनसेची ही सदस्य मोहीम आता राज्यभर सुरु झाली असून मुंबईतही आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने या मोहिमेला मनसेकडून बळकटी देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत निशाणा साधाला. 

मुंबईचा विकास, समस्या आणि खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शिवसेनाल लक्ष्य केले. खड्डेविरहीत रस्ते हे काय रॉकेट सायन्स नाही. तरीही त्यासाठी लोकांना सातत्याने आवाज उठवावा लागत आहे, असे म्हणत मनसेच्या देशपांडे यांनी शिवसेनेवर आणि शिवसेना महापालिकेतील सत्तेच्या कारभारावरुन गंभीर आरोप केले. भ्रष्टाचार झालेलाच आहे, मुळाथ धोरणच नाही. महापालिकेकडून दरवर्षी मिळणाऱ्या २५ ते ३० हजार कोटींचं तुम्ही केलं काय?, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच, ना नीट रस्ते आहेत, ना पाणी मिळतंय. पाणी तर दरवर्षी तुंबतंय, तुम्हाला आलेला वेड्याचा झटका हे महापालिकेचं धोरण होऊ शकत नाही. आज तुम्हाला झटका आला की, तुम्हाला सायकल ट्रॅक बनवायचाय, पेंग्विन आणायचाय, आणले पेंग्विन. लोकांच्या हिताचं जे आहे ते केलं पाहिजे, असे म्हणत मनसेच्या देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच, 

वारसा हा विचारांचा असतो

कुठलीही वास्तू म्हणजे वारसा नाही, वारसा हा विचारांचा असतो, हे राज ठाकरे यांनी आत्ताच सांगितलंय, ते महत्त्वाचं आहे, असे म्हणत भाजपकडूनही आता बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं जात असल्यावरुनही शिवसेनेलाच लक्ष्य केलं.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामनसेसंदीप देशपांडेशिवसेना