Join us

"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 20:55 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

Aaditya Thackery on CM Devendra Fadnavis Offer: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोपसमारंभात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. विधान परिषदेत अंबादास दानवे यांचा निरोप समारसंभ पार पडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी भाषणं केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मोठी ऑफर दिली. आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याचा स्कोप उरलेला नाही, मात्र तुम्ही इथे या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या ऑफरवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ ४४ दिवसांनी संपत आहे. मात्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उद्देषून केलेल्या विधानामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. उद्धवजी तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्यावर विचार करता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जे गेलेत ते जड झाले असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

"भीती कोणाला वाटेल हे जास्त माहिती नाही. पण असं आनंदाचे वातावरण नेहमी सभागृहात असायला पाहिजे. प्रत्येक वेळी भांडणे, द्वेष नको. कधी कधी अशा जुन्या आठवणी काढायला हव्यात. सोबत जे खेचून घेऊन गेलेत ते मनात किंवा हृदयात जड झाले आहेत," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

अंबादास दानवेच्या निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या ऑफरवर प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, हा प्रश्न नुसता बाकाचा नाही तर प्रसंग बडा बाका आहे. सभागृहात काही गोष्टी खेळीमेळीने होत असतात. त्या खेळीमेळीने घ्यायला हव्यात, असं म्हटलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"उद्धवजी २०२९ पर्यंत तरी आमचा त्याबाजूला (विरोधक) येण्याचा काहीच स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. त्यावर विचार करता येईल. त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :विधानसभाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसआदित्य ठाकरे