उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली; विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना दिला होकार?

By मुकेश चव्हाण | Published: October 30, 2020 07:49 PM2020-10-30T19:49:29+5:302020-10-30T19:59:51+5:30

उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत बातचीत केली.

actress Urmila Matondkar accepts Shiv Sena's offer of Legislative Council? | उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली; विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना दिला होकार?

उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली; विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना दिला होकार?

googlenewsNext

मुंबई: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

उर्मिला यांचं नाव शिवसेनेकडून निश्चित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत बातचीत केली. तसेच उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्यास होकार देखील दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

तत्पूर्वी, मराठी चेहरा आणि मराठी नाव असल्यानं उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. याशिवाय त्या कला क्षेत्रातून असल्यानं राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य उमेदवार आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणुकही लढवली.

मात्र भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतरही काँग्रेसनं त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. मात्र आपल्याला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असं उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याची माहिती समोर आली होती. 

राज्यपाल नियुक्त जागांसाठी कोणते निकष आवश्यक?

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असा निकष आहे. या निकषांची पूर्तता न झाल्यास राज्यपाल त्या नावांना आडकाठी करू शकतात किंवा ही नावं फेटाळली जाऊ शकतात. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे संबंधही तसे फारसे सलोख्याचे नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कोर्टात जाण्याची वेळ आल्यास काय तयारी ठेवावी लागेल या सर्वच बाबींवर महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यामुळे नाव ठरवण्यास वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा- भाजपाचे नेते निलेश राणे

 शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत असल्यानं जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, असा टोला भाजपाचे नेते निलेश राणे यांनी लगावला आहे. तसेच एक वेळ अशी येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील, अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. 

Web Title: actress Urmila Matondkar accepts Shiv Sena's offer of Legislative Council?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.