Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री सलमा आगा यांची पर्स हिसकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 08:13 IST

सलमा या शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरातून रिक्षाने मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी जात होत्या. त्यावेळी दुचाकीस्वारांनी त्यांची पर्स हिसकावून पळ काढला.

ठळक मुद्देया प्रकरणी कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही, असे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी सांगितले.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा यांची पर्स मोटारसायकलस्वारांनी हिसकावली. त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात त्या जखमी झाल्या. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार मिळाली नसल्याचे वर्सोवा पोलिसांकडून सांगण्यात आले.

सलमा या शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरातून रिक्षाने मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी जात होत्या. त्यावेळी दुचाकीस्वारांनी त्यांची पर्स हिसकावून पळ काढला. शुक्रवारी रात्री २ च्या सुमारास त्यांच्या ड्रायव्हरने बंगल्यात गाडी सोडली. त्यानंतर त्यांना औषध घेण्यासाठी वर्सोव्याला जायचे होते. त्यामुळे त्या रिक्षाने जायला निघाल्या. वाटेतच दोन दुचाकीस्वारांनी त्यांची पर्स हिसकावत पळ काढला. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पर्स हरविल्याची तक्रार कराल तर आरोपींना शोधू, असे म्हटले. मात्र, त्यांना दरोड्याची तक्रार करायची होती. पण, वर्सोवा पोलिसांनी कोणतीही तक्रार घेतली नाही, असा आरोप सलमा यांनी केला आहे. मात्र, या प्रकरणी कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही, असे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईचोरगुन्हेगारी