मुंबई : मोलकरणीला शिवीगाळी करून मारहाण केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्यावर खार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कपडे खराब केल्याच्या कारणावरून तिने मारहाण करीत पगार थकविला असल्याची तक्रार एस्थर खेस हिने दिली आहे. पीडित तरुणी ही २७ एप्रिलपासून किम शर्माकडे घरकाम करीत होती. २१ मे रोजी ती किमचे कपडे धूत असताना गडद कपड्याचा रंग सफेद कपड्यांना लागला. हे समजल्यानंतर किमने तिला शिवीगाळी करीत मारहाण केली. पगार न देता हाकलून लावल्याची तक्रार खेस हिने खार पोलिसांकडे केली. तर किमने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. दर महिन्याच्या ७ तारखेला मी कामगारांना पगार देते. एस्थरला अजिबात मारहाण केलेली नसून तिनेच माझे ७० हजारांचे ड्रेस खराब केले आहेत, असे तिने पोलिसांना सांगितले.
अभिनेत्री किम शर्माची मोलकरणीला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 05:25 IST