Join us  

... त्यानुसार कारवाई होईल, सचिन वाझेप्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 11:55 AM

सचिन वाझे हे शुक्रवारी सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली.

ठळक मुद्देसचिन वाझे हे शुक्रवारी सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली.

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली. सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझेंची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

सचिन वाझे हे शुक्रवारी सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. त्यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सरकार आणि गृह विभागाच्या कारवाईकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणावर भाष्य केलंय. 

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या जिलेटीनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओचा आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयए व एटीएसकडून सुरू आहे. त्यामुळे, चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, त्यानुसार आरोपींवर कारवाई होईल, असे स्पष्ट मत देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. 

भाजपा आक्रमक, नार्को टेस्टची मागणी

सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

देशमुख-फडणवीस यांच्या जुंपली

सचिन वाझे प्रकरणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात विधानसभेत चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण (Anvay Naik Death Case) दाबल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्या प्रकरणी फडणवीस यांनी देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. 

टॅग्स :सचिन वाझेअनिल देशमुखगुन्हेगारीराष्ट्रीय तपास यंत्रणा