Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तटकरे, पटेल यांच्यावर कारवाई करावी लागेल'; शरद पवारांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 17:29 IST

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे, दरम्यान या सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते, आता शरद पवार यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. खासदार सुनिल तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई कारवाई करावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला. 

शपथविधीनंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा, शरद पवार स्पष्टच बोलले...

शरद पवार म्हणाले, पक्षाच्या धोरणाशी विसंगत पाऊले कोणी टाकली असतील तर त्याचा निर्णय पक्षाचे लोक बसून घेतली. जयंत पाटील आदींशी चर्चा करावी लागेल. एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. काहींची पदाधिकारी यांची नेमणूक मी केलेली आहे. जनरल सेक्रेटरी म्हणून सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक मी केलेली आहे. त्यांनी पक्षाच्या भल्यासाठी पाऊले टाकलेली नाहीत. त्यांनी जबाबदारी पार पाडलेली नाही. यामुळे त्यांच्यावरील पुढील कारवाई मला करावी लागेल, असा सूचक इशारा शरद पवार यांनी दिला. 

'राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्षनेत्याच्या नेत्याची नियुक्ती करायची असेल तर पक्ष प्रमुख म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, तो काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना यांचा असू शकतो, असे ते म्हणाले.  राज्यातील कार्यकर्त्यांवर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यांची अस्वस्थता झाली असणार. आम्हाला निवडून देतात, आम्ही सांगू ती भूमिका मांडतात. ते अस्वस्थ होणार, त्यांची अस्वस्थता काढायची असेल तर पुन्हा संघटना बांधावी लागणार आहे. ते मी आणि तरुण कार्यकर्ते करू, असे पवार म्हणाले. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार