ब्रेड आणून दिला नाही म्हणून भावाने घेतला सख्ख्या भावाच्या गळ्याचा घोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 18:24 IST2018-07-05T18:16:21+5:302018-07-05T18:24:07+5:30

माहिम परिसरातील धक्कादायक घटना

An act of black money stashed in a relationship; Brother did not bring bread, so brother took his brother's neck | ब्रेड आणून दिला नाही म्हणून भावाने घेतला सख्ख्या भावाच्या गळ्याचा घोट 

ब्रेड आणून दिला नाही म्हणून भावाने घेतला सख्ख्या भावाच्या गळ्याचा घोट 

 मुंबई - माहिम किल्ला परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे हत्येत पर्यवसन झाले. काल उशिरा १२ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादात मद्यधुंद भावाने गळा आवळून सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी इम्रान फिरोझ सय्यदला (वय - २६) अटक करण्यात आली आहे. 

काल रात्री १२ वाजताच्या सुमारास घरी आलेल्या इम्रानने धाकटा भाऊ इरफानला (वय - १८) रात्रीचे जेवण करताना ब्रेड विकत आणण्यास सांगितले होते. मात्र, इरफानने जाण्यास नकार दिल्याने रंगाच्या भरात ताडी पिऊन आलेल्या मोठ्या भावाने इरफानच्या गळ्याचा घोट घेतला आहे. जोरदार गळा दाबल्याने इरफानच्या तोंडातून फेस आला आणि जीव गेला. अशी माहिती पोलिसांनी दिली. वडील फिरोझ यांनीच इरफानला रुग्णालयात नेले. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. फिरोझ हे इडली विकण्याचं काम करतात. मयत इरफान हा काच - बटण लावण्याचे काम करायचा तर आरोपी भाऊ इम्रान हा इलेक्ट्रिशियनचं काम करतो. 

Web Title: An act of black money stashed in a relationship; Brother did not bring bread, so brother took his brother's neck