Accused try to mastrubute front of sumeet raghvans wife, register police complaint | धक्कादायक! अभिनेता सुमीत राघवनच्या पत्नीसमोर हस्तमैथुनाचा प्रयत्न, काही तासांतच आरोपीला बेड्या

धक्कादायक! अभिनेता सुमीत राघवनच्या पत्नीसमोर हस्तमैथुनाचा प्रयत्न, काही तासांतच आरोपीला बेड्या

ठळक मुद्देज्यावेळी चिन्मयी त्या चालकाला मारण्यासाठी त्याच्या दिशेने धावल्या, त्यावेळी तो तिथून पळून गेला.अलीकडेच प्रदर्शित झालेल्या आपला मानूस चित्रपटात सुमीत राघवन मुख्य भूमिकेत आहे.

मुंबई - मुंबईत सध्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसमोर हस्तमैथुन करण्याच्या घटना वाढल्या असून सोमवारी सकाळी अभिनेते सुमीत राघवन यांची पत्नी चिन्मयी सुमीत यांना असाच धक्कादायक अनुभव आला. चिन्मयी सुमीत सोमवारी सकाळी विलेपार्लेजवळच्या पार्लेटिळक शाळेजवळ होत्या. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारमधील चालकाने चिन्मयी यांच्या समोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. दरम्यान,  या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांमध्येच बेड्या ठोकल्या आहेत. 

ज्यावेळी चिन्मयी त्या चालकाला मारण्यासाठी त्याच्या दिशेने धावल्या. त्यावेळी तो तिथून पळून गेला. आरोपीने राखाडी रंगाचा सफारी परिधान केला होता. चिन्मयी यांना कारचा पूर्ण नंबर लिहून घेता आला नाही. 1985 हे शेवटचे चार डिजिट आहेत. अभिनेते सुमीत राघवन यांनी यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

सुमीतने फेसबुक पोस्ट लिहिताना मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या आपला मानूस चित्रपटात सुमीत राघवन मुख्य भूमिकेत आहे. सुमीत यांची पत्नी चिन्मयी सुद्धा अभिनेत्री असून त्यांनी अनेक मराठी नाटक, मालिकांमध्ये काम केले आहे.                                                   

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Accused try to mastrubute front of sumeet raghvans wife, register police complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.