मुलीवर बलात्कार करणाऱ्यास उत्तराखंडात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 12:03 IST2023-08-06T12:02:58+5:302023-08-06T12:03:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला स्वतःचा वाढदिवस असल्याच्या निमित्ताने फिरायला नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक ...

accused in Rape on girl arrested in Uttarakhand | मुलीवर बलात्कार करणाऱ्यास उत्तराखंडात अटक

मुलीवर बलात्कार करणाऱ्यास उत्तराखंडात अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला स्वतःचा वाढदिवस असल्याच्या निमित्ताने फिरायला नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत आरोपी पसार झाला होता. मात्र, याप्रकरणी जुहू पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर समांतर तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने त्याला उत्तराखंडमधून ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने केली कारवाई
रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गांधीग्राम चौपाटीजवळ पार्क केलेल्या रिक्षात आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पळ काढण्याचा प्रकार जुहू पोलिसांच्या हद्दीत २३ जुलै रोजी हा प्रकार उघड झाल्यावर संदीप नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष नऊचे प्रमुख दया नायक हे करत होते. ही मुलगी आरोपीला संदीप या नावाने ओळखत होती, जो अंधेरी पश्चिमेच्या लल्लूभाई पार्क हिमांशू बिल्डिंग परिसरात राहायचा इतकीच माहिती त्यांच्याकडे होती. 
त्याबाबत कोणतेही धागेदोरे हाती नसताना नायक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी सुरत चुफे भूल उर्फ संदीप कालूसिंह भूल (३०) याला उत्तराखंडमध्ये अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला जुहू पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: accused in Rape on girl arrested in Uttarakhand