चुकून गॅसचा पाईप कापल्याने आगीचा भडका उडाला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 09:24 PM2020-01-24T21:24:39+5:302020-01-24T21:25:55+5:30

वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात येऊन आगीचा मोठा भडका उडाला.

Accidentally cutting a gas pipe causing a fire | चुकून गॅसचा पाईप कापल्याने आगीचा भडका उडाला 

चुकून गॅसचा पाईप कापल्याने आगीचा भडका उडाला 

googlenewsNext
ठळक मुद्दे एका कर्मचाऱ्याकडून पाईपलाईनचे काम करताना महानगर गॅसचा पाईप चुकून कापला गेला.आगीवर तासाभरात नियंत्रण मिळविण्यात आले. 

मुंबई - मुलुंड येथील  भक्तिमार्ग परिसरामध्ये महानगर एलपीजी गॅसची गळती झाल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुपारी बाराच्या सुमारास पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम सुरू होते. एका कर्मचाऱ्याकडून पाईपलाईनचे काम करताना महानगर गॅसचा पाईप चुकून कापला गेला. त्याचवेळी दुसरा कर्मचारी त्याठिकाणी वेल्डिंग काम करत होता. वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात येऊन आगीचा मोठा भडका उडाला.

या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्याच्याकडेला असलेले झाड या आगीच्या विळख्यात आले आणि जळालं. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गॅस पुरवठा खंडित करून ही आग तासाभरात आटोक्यात आणली. मात्र, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. आगीवर तासाभरात नियंत्रण मिळविण्यात आले. 

Web Title: Accidentally cutting a gas pipe causing a fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.