विद्याविहार स्थानकाजवळ ट्रक उलटला, दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 13:37 IST2018-08-31T13:20:07+5:302018-08-31T13:37:32+5:30
मध्य रेल्वेवरील विद्याविहार स्थानकाजवळ ट्रक उलटल्याने मोठी दुर्घटना झाली आहे.

विद्याविहार स्थानकाजवळ ट्रक उलटला, दोन जण गंभीर जखमी
मुंबई - मध्य रेल्वेवरील विद्याविहार स्थानकाजवळ ट्रक उलटल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. विद्याविहार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 1वरील तिकीट खिडकीजवळच्या रस्त्यावर हा ट्रक कलंडला असून, विटांनी भरलेल्या या ट्रकखाली पाच मजूर अडकले होते. दरम्यान, या मजुरांना बाहेर काढण्यात आले असून गंभीर जखमी झालेल्या दोन मजुरांनी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विद्याविहार स्थानकाजवळ ट्रक उलटला, अनेक जण अडकल्याची भीती pic.twitter.com/bSR56JZ6Eh
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) August 31, 2018
आज दुपारच्या सुमाराच विटांनी भरलेला हा ट्रक विद्याविहार स्थानकातील तिकिटी खिडकीजवळ उलटला होता. टायर फुटल्याने हा ट्रक उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.