Accident on Ghatkopar-Mankhurd Link Road, leaving two critically injured | ट्रेलरची धडक बसून पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला, दोघे गंभीर जखमी 

ट्रेलरची धडक बसून पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला, दोघे गंभीर जखमी 

मुंबई  - मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर ट्रेलरची धडक बसून पादचारी पुलाचा सांगाडा कोसळल्याने अपघात झाला आहे. गोवंडीजवळील बेंगनवाडी सिग्नलजवळ मध्यरात्री हा अपघात झाला असून, या अपघातामुळे कोसळलेल्या पुलाच्या सांगाड्याखाली दबून चार गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

दरम्यान, अपघातामुळे कोसळेला पुलाचा सांगाडा अपघातस्थळावरून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.  त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक विभागाने पूलाचा सांगाडा रस्त्याच्या कडेला केल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे.

 

Web Title: Accident on Ghatkopar-Mankhurd Link Road, leaving two critically injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.