मुंबई : भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या ताफ्यादरम्यान एका महिलेच्या दुचाकीची कारला धडक बसल्याने वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करत सहायक पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलिस उपनिरीक्षक रामसिंग खर्डे (५२) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पूनम पाटील (३२) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना नोटीसही धाडली आहे. आशिष शेलार यांना विलेपार्ले येथे महत्त्वाच्या बैठकीसाठी घेऊन जात असताना एसव्ही रोड येथे पाटील यांच्या दुचाकीची त्यांच्या कारला धडक बसली. याच, रागात पाटील यांनी शिवीगाळ करत खर्डे यांना मारहाण केली.