Join us

फिरवण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचार, २० गुन्हे दाखल; सराईत आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:13 IST

पठाण हा पोलिस रेकॉर्डवरील असून, त्याच्याविरुद्ध १९ गुन्हे नोंद आहेत. तसेच त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाईदेखील झाली आहे. 

मुंबई : दुचाकीवरून फिरवून आणण्याच्या बहाण्याने १२ वर्षीय मुलीला पार्किंगमधील कारमध्ये नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना डोंगरीत घडली.  याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी शोएब हैदर खान उर्फ शोएब पठाण (४०) याला अटक केली आहे. पठाण हा पोलिस रेकॉर्डवरील असून, त्याच्याविरुद्ध १९ गुन्हे नोंद आहेत. तसेच त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाईदेखील झाली आहे. 

डोंगरी भागात अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास पठाणने मुलीला बाईकवरून फिरवून आणतो सांगून सोबत नेले. तेथून  वाडीबंदर येथील पार्किंगमधील कारमध्ये बसवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. या घटनेने मुलीला धक्का बसला आहे. 

-   तेथून सुटका झाल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. -   याप्रकरणी लैंगिक अत्याचार आणि पोक्सोचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.  -  आरोपीला रात्री अटक करण्यात आली आहे. -   पठाणविरुद्ध ड्रग्ज तस्करी तसेच विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून, त्याला विविध गुन्ह्यांत अटकही झाली आहे.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसअटक