अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन; भाजप नेत्याचं थेट अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 04:53 PM2021-01-27T16:53:56+5:302021-01-27T16:54:36+5:30

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचं कनेक्शन हे मुंबईतील आझाद मैदानातील अबू आझमींच्या भाषणाशी आहे का?

Abu Azmi connection to violence in Delhi BJP leader letter o Amit Shah | अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन; भाजप नेत्याचं थेट अमित शहांना पत्र

अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन; भाजप नेत्याचं थेट अमित शहांना पत्र

Next

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचं कनेक्शन हे मुंबईतील आझाद मैदानातील अबू आझमींच्या भाषणाशी आहे का? याची चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं आहे. भातखळकर यांच्या पत्रानं आता दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईतही राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

"घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे. मोदीजी तुम खतम हो जाओगे", अशी वक्तव्य आझमी यांनी मुंबईतील भाषणात केल्याचं भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे. अबू आझमी यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली असून त्यामागचा बोलवता धनी कोण हे शोधायला हवं, असं आवाहन भातखळकर यांनी केलं आहे. 


 

भातखळकर पत्रात काय म्हणाले?
देशाच्या कृषी क्षेत्रात क्रांतीकारी बदल आणण्यासाठी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केले. पण काही राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं आणि त्यांची माथी भडकवण्याचं काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदानात २५ जानेवारी २०२१ रोजी शेतकरी आंदोलन करण्यात आलं. यात व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. या आंदोलनाला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भडकाऊ विधानं केली आहेत. आझमी यांनी लोकांना घराबाहेर पडून गोंधळ घालण्याचं आवाहन केलं होतं. यात मोदींबद्दल आक्षेपार्ह विधानं देखील केली आहेत. अबू आझमींनी केलेल्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी २६ जानेवारी २०२१ ला दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या आडून गोंधळ घालण्याचा प्रकार घडला. त्यामुळे अबू आझमींची चौकशी करणं आवश्यक आहे, असं अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abu Azmi connection to violence in Delhi BJP leader letter o Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app