मुंबई विमानतळावर ५ कोटी ७० लाखांचे सोने जप्त; १४ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

By मनोज गडनीस | Published: April 20, 2024 04:43 PM2024-04-20T16:43:13+5:302024-04-20T16:44:48+5:30

गेल्या १५ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण ९ किलो ४८२ ग्रॅम सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.

about 5 crore 70 lakh gold seized at mumbai airport action of customs department in 14 cases | मुंबई विमानतळावर ५ कोटी ७० लाखांचे सोने जप्त; १४ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावर ५ कोटी ७० लाखांचे सोने जप्त; १४ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

मनोज गडनीस, मुंबई :  गेल्या १५ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये मुंबईविमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण ९ किलो ४८२ ग्रॅम सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत ५ कोटी ७० लाख रुपये इतकी आहे. एकूण १४ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

नैरोबी, अदिस अबाबा, पॅरिस येथून मुंबईत आलेल्या चार परदेशी प्रवाशांना या प्रकरणी अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर सोन्याचे बार व दागिने आढळून आले. त्यांचे एकत्रित वजन १६८१ ग्रॅम इतके आहे. तर, दुबई, अबुधाबी, जेद्दा, बाहरिन, कुवेत, जकार्ता येथून मुंबईत आलेल्या भारतीय नागरिकांना या सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यापैकी एका प्रकरणात एका प्रवाशाने त्याच्या अंतर्वस्त्रात चोर कप्पा तयार करत त्यामध्ये सोने लपवल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. या कारवाई दरम्यान एकूण ६६२७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

Web Title: about 5 crore 70 lakh gold seized at mumbai airport action of customs department in 14 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.