कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा: अजित पवार; पीयूष गोयल यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 07:27 IST2024-12-20T07:26:42+5:302024-12-20T07:27:38+5:30

कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून केली आहे.

abolish export duty on onion dcm ajit pawar writes letter to piyush goyal | कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा: अजित पवार; पीयूष गोयल यांना लिहिले पत्र

कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा: अजित पवार; पीयूष गोयल यांना लिहिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून केली आहे.

श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी कमी करून अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरू केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्यातील आमदार नितीन अर्जुन पवार, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोजताई अहिरे आदी आमदारांनी उपमुख्यमंत्री पवार यांना याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

 

Web Title: abolish export duty on onion dcm ajit pawar writes letter to piyush goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.