Join us

सत्तास्थापनेसाठी मुंबईत खलबते, अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 08:38 IST

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्याने अभिषेक बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय खलबते झाली, याबाबत चर्चा रंगल्या.

मुंबई : सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळवीच्या प्रयत्नांना  वेग आला आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खा. अभिषेक बॅनर्जी व डेरेक ओब्रायन यांनी मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्याने अभिषेक बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय खलबते झाली, याबाबत चर्चा रंगल्या. तृणमूल काँग्रेस व उद्धवसेना ‘एनडीए’मध्ये सामील होण्याचा कयासही बांधला जात आहे.

राणे - राज ठाकरे भेटरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खा. नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.

‘एनडीए’साठी उद्धव ठाकरेंना फोन‘एनडीए’मध्ये सामील होण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरे यांना फोन आल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीला यश मिळाले असताना ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

टॅग्स :उद्धव ठाकरेममता बॅनर्जीलोकसभा निवडणूक २०२४ निकाललोकसभा निवडणूक २०२४