Join us  

रुग्णांसाठी 'अबोट'ची लाईफलाईन, थेट डॉक्टरांशी करता येईल मोफत 'साईन इन' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 9:06 PM

जागतिक आरोग्यसेवा कंपनी असलेल्या एबॉटने आज आपल्या जागतिक एःकेअर प्रोग्रामचा भाग म्हणून नवीन डिजिटल आरोग्यसेवेला भारतात सुरूवात केली.

मुंबई - आरोग्य सुविधासंदर्भातील देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या 'एबॉट'कडून भारतात आपल्या जागतिक एःकेअर प्रोग्रामचा भाग म्हणून नवीन डिजिटल सेवेला सुरूवात करण्यात आली आहे. या डीजिटल सेवेमार्फत डॉक्टर ते रुग्ण असा थेट संवाद होणार आहे. त्यामुळे, रुग्णांना आपल्या आजारासंदर्भात महत्त्वपूर्ण, सत्य आणि विश्वासार्ह माहितीचा खनिजा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. विशेष, म्हणजे या वेबसाईटवरुन रुग्णांना डॉक्टरांचा मोफत सल्लाही मिळेल. रुग्णांची वाढती संख्या आणि डॉक्टरांवरील ताण पाहता ही वेबसाईट रुग्णांसाठी लाईफलाईन ठरेल, असे अबोट कंपनीचे भारतातील प्रमुख जावेद झिया यांनी म्हटले. 

जागतिक आरोग्यसेवा कंपनी असलेल्या एबॉटने आज आपल्या जागतिक एःकेअर प्रोग्रामचा भाग म्हणून नवीन डिजिटल आरोग्यसेवेला भारतात सुरूवात केली. एबॉटच्या फार्मास्युटिकल व्यवसायाचा भाग असलेला एःबॉट प्लॅटफॉर्म डॉक्टर आणि ग्राहकांना लोकांना चांगले आरोग्य मिळवण्यासाठी सहाय्यभूत सेवा आणि माहिती देतो. भारत हा पहिला देश आहे, जिथे एबॉटने आपला डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला असून तो आपल्याला www.acare.co.in येथे किंवा अँड्रॉइड प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केलेल्या अॅपच्या स्वरूपात मिळू शकेल. त्यासाठी रुग्णांना अबोटच्या अॅपमध्ये किंवा वेबसाईटवर जाऊन साईन इन करावे लागणार आहे. त्यानंतर, पुढील माहिती भरल्यानंतर संबंधीत डॉक्टरांकडून तुम्हाला एक कोड मिळेल. त्याद्वारे तुम्ही उपचारासंबंधीची माहिती घेऊ शकणार आहात. विशेष म्हणजे, सध्याजरी ही सुविधा इंग्रजीत उपलब्ध असली, तरी भारतातील विविध भाषा आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा विचार करुन कंपनीकडून नोव्हेंबरमध्ये हिंदी आणि मराठीत ही कन्सल्टंट सुविधा रुग्णांना पुरवली जाणार आहे. 

सुरुवातीला डायबेटीस, थायरॉइड आणि ऑस्टिओआर्थरायटिस यांचा समावेश असून त्यांची एका वर्षात नंतरच्या टप्प्यात अधिक थेरपींचा समावेश करण्याची योजना असल्याचे कंपनीचे भारतातील प्रमुख जावेद झिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. एबॉटने आपल्या जागतिक एःकेअर प्रोग्रामची रचना लोकांना फक्त आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने नाही तर जगभरात वाढत्या आरोग्यसेवा यंत्रणांवरील काही ताण कमी करण्यास मदत करण्यासाठी केल्याचेही ते म्हणाले. या नवीन ऑनलाइन पोर्टलची रचना ग्राहक आणि डॉक्टरांमधील संवादाची दरी सांधून आरोग्याच्या व्यवस्थापनासाठी सहाय्यभूत, सर्वांगीण दृष्टीकोन देण्यासाठी करण्यात आली आहे. याचे एक उदाहरण म्हणजे एःकेअर पोर्टलद्वारे ग्राहकांना आपल्या डॉक्टरांना आपण ऑनलाइन देत असलेली आरोग्याची माहिती खासगीपणे आणि सुरक्षितरित्या पाहण्याची परवानगी देता येते आणि डॉक्टर आपल्या रूग्णांचे वैद्यकीय पूर्तता अहवाल पाहू शकतात.

पहिल्या टप्प्यात एःकेअर डॉक्टर आणि रूग्णांच्या गरजांवर काम करतील तर फार्मसिस्ट नंतरच्या टप्प्यावर समाविष्ट करून घेतले जातील. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या तीन स्पेशालिटी क्षेत्रे आहेत. त्यात मधुमेह, थायरॉइड आणि ऑस्टिओआर्थरायटिस यांचा समावेश असून त्यांची एका वर्षात नंतरच्या टप्प्यात अधिक थेरपींचा समावेश करण्याची योजना आहे. भविष्यातील इतर सुधारणांमध्ये एका नेटिव्ह अॅपचे अनावरण, संवादात्मक आणि प्रादेशिक साहित्य, बहुभाषिक प्लॅटफॉर्म आणि रूग्णांना आपल्या आरोग्याची नीट काळजी घेता यावी यासाठी एक वैयक्तिक हेल्थ कोच यांचा समावेश आहे. 

डॉ. मनोज चढ्ढा, कन्‍सल्‍टंट एन्डोक्रिनोलॉजिस्‍ट, हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई आणि इमिजिएट पास्‍ट प्रेसिडेंट-एन्डोक्राइन सोसायटी ऑफ इंडिया, यांनी एःकेअरच्या अनावरणाच्या निमित्ताने सांगितले की, "रूग्णांमध्ये आजारांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान एक मोठी भूमिका निभावत आहे. वैज्ञानिकदृष्टया सुयोग्य माहिती आणि तज्ञ सल्लागारांकडून सल्ला मिळवण्याची शक्यता यांच्याद्वारे एःकेअर चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी आणि गैरसमजुती दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे डॉक्टरांना रूग्णांसोबत उच्च दर्जाचा सहभाग साध्य करणे शक्य होईल. जास्त चांगले परिणाम साध्य करता येतील.” 

डॉ. राम चढ्ढा, कन्‍सल्‍टंट स्पाइन सर्जन, लिलावती हॉस्पिटल, मुंबई आणि माजी अध्यक्ष- असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स ऑफ इंडिया पुढे म्हणाले की, ''यासारख्या व्यासपीठामुळे आम्हाला आमच्या रूग्णांसोबत ते क्लिनिकमधून गेल्यावरही संपर्कात राहणे शक्य होईल. जेणेकरून आम्ही त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत पूर्तता आणि सुस्पष्टता देऊ शकतो. यामुळे सातत्यपूर्ण लक्ष ठेवणे आवश्यक असलेल्या गंभीर आजारांचे दीर्घकालीन व्यवस्थापन करणे शक्य होईल. याशिवाय, आपले वेळापत्रक व्यग्र असताना एःकेअर हा वैद्यकीय व वैज्ञानिक लिटरेचरमधील चांगला संदर्भ आहे आणि तो आमच्या कामासाठी महत्त्वाचा आहे.'' 

डॉक्टरांसाठी एःकेअरएःकेअर ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे डॉक्टरांना वैज्ञानिक माहिती, व्हर्च्युअल अध्ययन साधने आणि शैक्षणिक कार्यक्रमावर आधारित गेम्स पाहता येतील. डॉक्टर सर्वोत्तम स्थानिक व आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून शिकू शकतात आणि आपल्या रूग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सर्वाधिक अचूक व सुसंगत माहिती देऊ शकतील याची काळजी ते घेऊ शकतात.

ग्राहकांसाठी एःकेअरएःकेअर प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना आपल्या प्रकृतीला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेणे, उपचार करणे आणि लक्ष ठेवणे शक्य होते. या कार्यक्रमातून लोकांना आपल्या आरोग्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन, माहिती व साहित्य दिले जाते आणि आपल्या औषधांच्या तसेच उपचार योजनांच्या पूर्ततेवर आरोग्याशी संबंधित पुरस्कार मिळवणेही शक्य होते. 

एःकेअर बाबतएःकेअर हा एबॉटच्या फार्मास्युटिकल व्यवसायाकडून देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आरोग्यसेवांचा जागतिक ब्रँड आहे. लोकांना चांगले आरोग्य मिळवण्यास मदत करण्याच्या हेतूने एःकेअरच्या सेवांची रचना प्रतिबंध ते जागरूकता, उपचार आणि प्रेरणा अशा विविध प्रकारच्या आरोग्यसेवा प्राप्त करण्यासाठी केली गेली आहे. जागतिक एःकेअर प्रोग्राममध्ये सध्या भारतात उपलब्ध असलेले नवीन ऑनलाइन पोर्टल तसेच इतर डिजिटल अॅप्स व ऑफलाइन सोल्यूशन्‍स समाविष्ट आहेत. जसे रूग्णांना देण्यासाठी डॉक्टरांकडे शैक्षणिक किट्स. एःकेअरची उत्पादने देशनिहाय बदलत जातात. या सेवा मोफत आहेत आणि कोणतेही उत्पादन, उपचार किंवा आजाराशी बांधलेल्या नाहीत. लोकांना एःकेअर वापरण्यासाठी एबॉट औषधांचा वापर करण्याची गरज नाही. एःकेअरवर नोंदणी करू इच्छिणारे डॉक्टर्स एःकेअरच्या सेटअपसाठी आमच्या नॅशनल हेल्पलाइनवर फोन करू शकतात.  

टॅग्स :डॉक्टरऑनलाइनहॉस्पिटलहेल्थ टिप्स