Aarey Forest : आरेचे आंदोलन सुरूच ठेवणार - आम आदमी पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 03:58 AM2019-09-24T03:58:00+5:302019-09-24T03:58:17+5:30

Aarey Forest : स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कारशेडचा मुद्दा पोहोचविणार असल्याचे आपच्या महाराष्ट्रातील नेत्या प्रीती मेनन यांनी सोमवारी स्पष्ट केले.

Aarey's movement will continue - Aam Aadmi Party | Aarey Forest : आरेचे आंदोलन सुरूच ठेवणार - आम आदमी पार्टी

Aarey Forest : आरेचे आंदोलन सुरूच ठेवणार - आम आदमी पार्टी

Next

मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेडविरोधातील आंदोलन सुरूच ठेवणार असून आणखी तीव्र करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कारशेडचा मुद्दा पोहोचविणार असल्याचे आपच्या महाराष्ट्रातील नेत्या प्रीती मेनन यांनी सोमवारी स्पष्ट केले.

आपने सुरुवातीपासून आरे येथील मेट्रोच्या कारशेडला विरोध केला आहे. स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमींना या मुद्द्यावर सोबत केली आहे. निवडणुकीच्या काळातही ते या मुद्द्यावर आक्रमक होणार आहेत. आपच्या प्रचाराची सुरुवातच आरे येथून होणार आहे. पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय सिंग येत्या बुधवारी आरे येथील आदिवासी पाड्यांना भेटी देऊन आपच्या प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे प्रीती मेनन यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणाचा गळा घोटूनच विकास करावा, असा काही दंडक नाही. आरेचा मुद्दा हा मुंबईकरांचा आहे. आरेशिवाय कारशेड होणार नाही हा प्रशासनाचा दावा खोटा आहे. देशातील पहिली मेट्रो दिल्लीत सुरू झाली. तिथे एकाच ठिकाणी कारशेड न उभारता त्याचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्यामुळे आरे येथील कारशेडशिवाय मेट्रो शक्य नसल्याचा प्रशासनाचा दावा खोटा आहे. अशी भूमिका घेणारे अधिकारी आपल्या अकार्यकक्षमतेचे उदाहरणच देत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना हटवून सक्षम अधिकारी आणावेत, अशी मागणीही मेनन यांनी केली.

पर्यावरणावर हल्ला
पर्यावरणावर हल्ला करत कारशेडचे काम करण्यात येणार आहे. कारशेडपेक्षा पर्यावरण अधिक महत्त्वाचे आहे. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. याविरोधात आम आदमी पार्टीने सुरुवातीपासून आरे येथील मेट्रोच्या कारशेडला विरोध केला आहे. स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमींना या मुद्द्यावर आम्हाला सोबत केली आहे. निवडणुकीच्या काळातही हा मुद्दा लावून धरण्यात येणार आहे.

Web Title: Aarey's movement will continue - Aam Aadmi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.