भररस्त्यातच तरुणीला दाखवला पॉर्न व्हिडिओ, माटुंग्यातील धक्कादायक प्रकार! असं का केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:23 IST2025-12-05T15:18:47+5:302025-12-05T15:23:28+5:30
कामावरुन घरी परतणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला अनोळखी व्यक्तीने भररस्त्यात पॉर्न व्हिडिओ दाखवून पळ काढल्याची घटना माटुंगा येथे घडली.

भररस्त्यातच तरुणीला दाखवला पॉर्न व्हिडिओ, माटुंग्यातील धक्कादायक प्रकार! असं का केलं?
कामावरुन घरी परतणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला अनोळखी व्यक्तीने भररस्त्यात पॉर्न व्हिडिओ दाखवून पळ काढल्याची घटना माटुंगा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.
२१ वर्षीय तरुणी दादर परिसरात राहते. ती मालाड येथे नोकरीला आहे. ती मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास लोकलने दादर रेल्वे स्थानकात उतरली. चालत घरी जातना हिंदू कॉलनी येथे एका व्यक्तीने दीदी अशी हाक मारुन तरुणीला थांबवले. तरुणी थांबताच त्याने मोबाइलमधून पॉर्न व्हिडिओ तिला दाखवला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणीने आरडाओरडा करताच त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. तरुणीने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तरुण पसार झाला. घरी परतल्यानंतर तरुणीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.