Join us

मैत्रिणीशी भांडण झाल्याने तरुणाची आत्महत्या; ‘सीसीटीव्ही’ फुटेज डिलिट करणाऱ्यावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:18 IST

कुटुंबीयांना याबाबत समजताच त्यांना धक्का बसला. टेरेसवरील सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये मृत्यूपूर्वी मुलगा मानव फोनवर कोणाशी तरी बोलत होता. फोन खिशात ठेवून आत्महत्या केली. 

मुंबई : देवनारमध्ये मैत्रिणीशी झालेल्या भांडणानंतर तरुणाने घराच्या गच्चीवर गळफास घेत आयुष्य संपविल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दीड वर्षाने ट्रॉम्बे पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मैत्रिणीसह तिच्या वडिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. देवनार परिसरात राहणारे प्रकाश रमेश लालवानी (५७) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांचा मुलगा मानव (२४) याने आत्महत्या केली आहे. 

-  तो त्यांचा इलेक्ट्रॉनिक शोरूमचा व्यवसाय सांभाळत होता. चेंबूर येथे जेवण करण्यासाठी गेला. रात्री उशिराने घरी येत थेट टेरेस गाठले. गच्चीला लॉक लावून तरुणाने आत्महत्या केली. - कुटुंबीयांना याबाबत समजताच त्यांना धक्का बसला. टेरेसवरील सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये मृत्यूपूर्वी मुलगा मानव फोनवर कोणाशी तरी बोलत होता. फोन खिशात ठेवून आत्महत्या केली. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईपोलिस