Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:52 IST2025-10-16T15:39:17+5:302025-10-16T15:52:37+5:30
Mumbai Cyber Crime: सध्या 'डिजिटल अरेस्ट'ची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७२ वर्षीय व्यापाऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करुन ५८ कोटी लुटले आहेत.

Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
Mumbai Cyber Crime: सायबर फसवणुकीचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. सायबर गुन्हेगारांनी मुंबईतील एका व्यावसायिकाला धमकावून डिजिटल पद्धतीने अटक केली. सुमारे अडीच महिने चाललेल्या या सायबर फसवणुकीने व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीला लक्ष्य केले. या काळात या दांम्पत्याकडून आरोपींनी ५८ कोटी रुपये उकळले.
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडितेला आधी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. कॉल करणाऱ्याने ईडी कार्यालयातून असल्याचा दावा केला. त्यानंतर दुसरा कॉल आला, यामध्ये सीबीआय अधिकारी असल्याचा दावा करण्यात आला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
या प्रकरण आरोपींनी व्यापाऱ्याला मनी लॉड्रिंग प्रकरणात नाव आल्याचा दावा केला होता. हा प्रकार १९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर पर्यंत चालला. पीडितेला व्हिडीओ कॉल करण्यात आला, त्यानंतर त्याला आणि त्याच्या पत्नीला डिजिटली अटक करण्यात आली होती.
अटक करण्याची धमकी दिली
यावेळी आरोपींनी त्या व्यापारी दाम्पत्याला धमकी दिली. अटकेची भीती घातली. त्यानंतर त्यांना विविध बँक खात्यांची माहिती शेअर करण्यास आणि पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. यावेळी त्या व्यापाऱ्यांनी आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर केले. ही रक्कम अंदाजे १८ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली.
मुंबईतून आरोपींना अटक
काही दिवसांनी व्यापाऱ्यांना आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी सायबर सेलशी संपर्क साधला आणि त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर, आरोपींना अटक करण्यात आली. आर्थिक तपशीलांच्या मदतीने आरोपींचा माग काढला गेला आणि त्यांना अटक करण्यात आली. अब्दुल (४७) या एका आरोपीला मुंबईतील मालाड येथून अटक करण्यात आली. अर्जुन (५५) आणि त्याचा भाऊ जेठाराम (३५) या दोघांना मध्य मुंबई येथून अटक करण्यात आली.