मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:58 IST2026-01-15T11:56:01+5:302026-01-15T11:58:01+5:30
...यामुळे मतदान केंद्रातील सर्वअधिकारी, तसेच बंदोबस्ताला असलेल्या सुरक्षाकर्मचारी,पोलिसांमधे एकच खळबळ माजली.

मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
मुंबई - चेंबूर येथे काल रात्री १० वाजता प्रभाग क्रमांक १४७ रात्री १० वाजता लॉरेटो कॉन्व्हेन्ट शाळा, आर सी एफ कॉलनी येथील मतदान केंद्रात ४ फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळला होता. त्यामुळे मतदान केंद्रातील सर्वअधिकारी, तसेच बंदोबस्ताला असलेल्या सुरक्षाकर्मचारी,पोलिसांमधे एकच खळबळ माजली.
मतदान केंद्र अधिकारी राजेश मते यांनी बीएलओ सुनील कदम यांचा मुलगा, सर्पमित्र अभिरूप कदम व मानव अभ्यास संघ व महाराष्ट्र ॲनिमल रेस्क्यू असोसिएशन च्या प्राणीमित्राणी ४ फुटाच्या विषारी घोणस जातीचा सापाला सुरक्षित पकडून, ठाणे वनविभागाच्या जनार्दन बोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित ठिकाणी त्याच्या अधिवासात सोडण्यात आले .
एम - पूर्व व पश्चिम विभागाच्या, निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ. प्रियांका पाटील यांनी अभिरूप कदम यांचे आभार व्यक्त केले. त्याच्या कार्यतत्परते मुळे आजच्या पालिका निवडणुक मतदानाच्या दरम्यान घटणारी दुर्घटना टाळता आली.