बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे घातला तब्बल पाच कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 08:43 IST2025-10-19T08:42:03+5:302025-10-19T08:43:21+5:30
संबंधित वित्त व्यवस्थापकाला जूनमध्ये ट्सॲप समूहात सामील करण्यात आले.

बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे घातला तब्बल पाच कोटींचा गंडा
मुंबई : बहुराष्ट्रीय कंपनीतील ३५ वर्षीय वित्त व्यवस्थापकाला सायबर भामट्यांनी शेअर ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल पाच कोटी रुपयांना गंडा घातला. जास्त नफ्याचे आमिष दाखवत जून ते सप्टेंबरदरम्यान ही रक्कम टप्प्याटप्प्याने गुंतवायला लावली. याप्रकरणी १६ ऑक्टोबर रोजी पश्चिम सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
संबंधित वित्त व्यवस्थापकाला जूनमध्ये ट्सॲप समूहात सामील करण्यात आले. हा गट एका नामांकित कंपनीच्या नावाने तयार केला होता. या शेअर बाजाराबाबत अचूक आणि आकर्षक माहिती दिली जात होती. अनेक सदस्यांना भरघोस नफा मिळाल्याची उदाहरणेही सातत्याने दाखवली जात होती.