Join us

डम्परच्या धडकेत सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 13:11 IST

याप्रकरणी दहिसर पोलिसांनी चालक हरेंद्र महतो (५१) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मुंबई : कांदिवली पूर्व परिसरात आईसोबत स्कूटरवरून निघालेल्या सहा वर्षांच्या चिमुरड्याचा डम्परखाली चिरडून मृत्यू झाला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी चालक हरेंद्र महतो (५१) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

तक्रारदार सीमा गुप्ता (४२) या पती गणेश आणि मुले दक्ष (१२) आणि नकुल (६) यांच्यासह मीरा रोडमध्ये राहतात. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, १ मार्च रोजी त्या नकुलला स्कूटरवर त्यांच्यामागे बसवून कामावर घेऊन निघाल्या होत्या. दहिसर चेकनाका परिसरात १०.१५ च्या सुमारास त्या पोहोचल्या. त्यावेळी डम्पर चालक महतो याने तो अचानक डाव्या बाजूला घेतला. डंपरचा भाग गुप्ता यांच्या स्कूटरला लागल्याने मायलेक गाडीसह रस्त्यावर पडले. मात्र महतो याने गाडी न थांबवता ती तशीच पुढे नेली. ज्यामुळे नकुल याच्या अंगावरून गाडीचे मागचे डाव्या बाजूचे चाक गेले. या अपघातात नकुल गंभीररित्या जखमी झाला. या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी चालकाला  ताब्यात घेतले. नकुलला रिक्षातून तातडीने श्री साई रुग्णालयात हलवले. तेथील अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी नकुलला दाखल करून घेतले. मात्र उपचार सुरू असताना त्याला मृत घोषित केले.  

टॅग्स :अपघातमृत्यू