चित्रांमधून उमटले बदलत्या आधुनिकीकरणाचे प्रतिबिंब; चित्रकार मरेडू रामू यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

By स्नेहा मोरे | Published: March 27, 2024 07:17 PM2024-03-27T19:17:41+5:302024-03-27T19:18:44+5:30

मुंबई, हैदराबाद शहराच्या होणाऱ्या विकासापासून प्रेरणा घेऊन त्यात संभवणाऱ्या बदलांचे, जीवनशैलीचे, व सांस्कृतिक परिवर्तनाने फार बोलके चित्रमय दर्शन साकारले आहे.

A reflection of the changing modernization that emerged from the paintings; Exhibition of works by painter Maredu Ramu | चित्रांमधून उमटले बदलत्या आधुनिकीकरणाचे प्रतिबिंब; चित्रकार मरेडू रामू यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

चित्रांमधून उमटले बदलत्या आधुनिकीकरणाचे प्रतिबिंब; चित्रकार मरेडू रामू यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

मुंबई - आधुनिक जीवनपद्धती व पारंपरिक जीवनाची मूल्ये यातील संघर्षाची आणि त्यातून संभवणाऱ्या प्राकृतिक, सांस्कृतिक व जीवनपध्दतीतील मूल्यांचे परिवर्तन सामाजिक जीवनावर होते. हे अनाकलनीय बदल चित्रकार मरेडू रामू यांनी आपल्या चित्रांमधून रेखाटले आहे. समकालीन चित्रकार मरेडू रामू यांच्या ॲक्रिलिक रंगसंगती वापरून काढलेल्या आशयघन चित्रांचे एकल प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन २६ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत आयोजित केले आहे. कला रसिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल.

या प्रदर्शनातील चित्रे फार कलात्मक व आशयपूर्ण असून, आधुनिक शहरीकरणामुळे वातावरणात, हवामानात, जीवनशैलीत आणि सांस्कृतिक मूल्यांमध्ये होत असलेले बदल व त्यातील वैशिष्ट्ये दर्शवतात. प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये सौंदर्यपूर्ण संकल्पना व आशयघन शैली, माध्यमावर आणि वापरलेल्या तंत्रशैलीवर असणारे त्यांचे प्रभुत्व तसेच कलात्मकदृष्ट्या परिपूर्ण असे तयार करण्यासाठी असणारी त्यांची उत्कटता हा कलाविष्कार फार अर्थपूर्ण असा आहे. शेतीची पार्श्वभूमी व आंध्रप्रदेशातील ग्रामीण परिसर त्यानंतर मुंबई, हैद्राबाद सारखी विकसित आणि प्रगतीशील शहरे, तेथील लोकांचे राहणीमान, दैनंदिन जीवनपद्धती, आधुनिकीकरण होत असणाऱ्या महानगरातील बदल, हवामान व प्रदूषणाच्या समस्या, अर्धवट पूर्ण झालेली बांधकामे व त्यांच्यामुळे नागरिकांच्या जीवनावर होणारा परिणाम यांचे चित्रमय दर्शन त्यांनी चित्रमालिकेतून घडवले आहे.

मुंबई, हैदराबाद शहराच्या होणाऱ्या विकासापासून प्रेरणा घेऊन त्यात संभवणाऱ्या बदलांचे, जीवनशैलीचे, व सांस्कृतिक परिवर्तनाने फार बोलके चित्रमय दर्शन साकारले आहे. पशु, पक्षी, निसर्ग, त्यातील होणारे अपरिहार्य बदल, त्या बदलत्या मुल्यांमुळे संभवणारा अनपेक्षित बदल व काहीसा संस्कृतिमूल्यांचा ऱ्हास त्यांनी चित्रात दाखविला आहे. आधुनिक वातावरणात तग धरून धाडसाने जीवन जगणारे सामान्यजन त्यांची भावमूल्ये व सांस्कृतिक परिवर्तनशीलता आणि जगण्याची प्रत्येकाची धडपड व त्यादृष्टिने होणारे प्रयत्न या पैलूंवर त्यांनी कलात्मक विवेचन केले आहे. मरेडू रामू यांचे कलाशिक्षण एमएफएपर्यंत सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैद्राबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई, हैद्राबाद, बंगलोर, कोचीन नवी दिल्ली वगैरे अनेक ठिकाणी एकल व सामुहिक प्रदर्शनात चित्रे ठेवले. तसेच त्यांना अनेक प्रथितयश कलाप्रवर्तक संस्थांकडून पुरस्कार व मानसन्मान मिळाले आहेत. त्यांची चित्रे देशासह विदेशात मान्यवर कलासंग्राहकांच्या संग्रही विराजमान आहेत.

Web Title: A reflection of the changing modernization that emerged from the paintings; Exhibition of works by painter Maredu Ramu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.