विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 08:40 IST2025-11-09T08:40:05+5:302025-11-09T08:40:34+5:30
Mumbai Crime News: साकीनाका परिसरात एका मांजरावर अतिप्रसंगाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सुलेमान सोनी (५५) याच्याविरोधात साकीनाका पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवला.

विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
मुंबई - साकीनाका परिसरात एका मांजरावर अतिप्रसंगाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सुलेमान सोनी (५५) याच्याविरोधात साकीनाका पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवला.
तक्रारदार तौफिक शेख (२३) हे साकीनाका येथील संघर्षनगरमध्ये राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार शेख हे घरात नाष्टा करत असताना त्यांचा मित्र गणेश सावंत याने धावत येऊन शेजारच्या प्रगती सोसायटीतील खोली क्रमांक दोनमध्ये मांजराचा विचित्र आवाज येत असल्याचे सांगितले. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र नंतर त्यांनाही आवाज ऐकू येऊ लागल्याने ते घटनास्थळी गेले.
जखमी मांजरावर जोगेश्वरीत उपचार
घटनास्थळी पोहोचल्यावर सुलेमान सोनी याला मांजराला पकडून त्याच्यावर अतिप्रसंग करताना तौफिक शेख यांनी पाहिले. शेख यांनी तत्काळ त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. घटनेची माहिती त्यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. काही वेळातच साकीनाका पोलिस ठाण्याचे बीट मार्शल शिपाई सुशांत जाधव घटनास्थळी पोहोचले आणि सोनीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.