गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू, ६६ प्रवाशांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:33 IST2024-12-18T17:32:46+5:302024-12-18T17:33:02+5:30

बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरु झाले आहे.

A passenger boat heading to Elephanta from Gateway of India in Mumbai capsized, with more than 30 passengers on board. | गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू, ६६ प्रवाशांची सुटका

गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू, ६६ प्रवाशांची सुटका

मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुधवारी सायंकाळी उलटली. या दुर्घटने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६६ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या बोटीत ८० प्रवासी होते. दरम्यान, बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले मदत व बचावकार्य सुरु झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून फेरीबोट एलिफंटा लेण्यांकडे प्रवाशांना घेऊन जात होती. यावेळी ही दुर्घटना घडली. ही नीलकमल नावाची फेरीबोट असून उरण, कारंजा येथे बुडाली. या बोटीत ८० प्रवासी होते. घटनास्थळी नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचावकार्य चालू आहे.  तर या दुर्घटने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६६ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. 

दरम्यान, एका स्पीड बोटने या फेरीबोटीला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. त्यानुसार, ३.३० वाजताच्या सुमारास दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडियावरुन सुटली. त्यानंतर ५ ते ८ किमी आत समुद्रा ही बोट गेली होती. तेव्हाच एका स्पीड बोटने येऊन या फेरीबोटीला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईपासून एलिफंटा हे जवळपास ३० किलोमीटरचे अंतर आहे. यासाठी ४० ते ४५ मिनिटांचा प्रवास करावा लागतो.